Bhosari

भोसरी एमआयडीसीत तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटे पसार

By PCB Author

December 14, 2018

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – मोबाईलवर बुक केलेल्या कारची वाट पाहत रस्त्यावर उभी असलेल्या एका तरुणाजवळील अॅप्पल एक्स हा ८६ हजार रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला. ही घटना मंगळवारी (दि.११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील जे ब्लॉकमधील मिस्तसुभिशी इलेक्ट्रीक कंपनीसमोर घडली.

याप्रकरणी हेमंत शरदचंद्र श्रीनिवास वेलुरी (वय ३०) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील जे ब्लॉकमधील मिस्तसुभिशी इलेक्ट्रीक कंपनीसमोर हेमंत मोबाईलवर बुक केलेल्या कारची वाट पाहत रस्त्यावर उभा होता. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्या जवळील अॅप्पल एक्स ६४ जीबी मॉडेलचा ग्रे रंगाचा ८६ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.