भोसरी एमआयडीसीत चाकुचा धाक दाखवून तरुणाचा मोबाईल हिसकावला

0
304

भोसरी, दि. २० (पीसीबी) – कामावर निघालेल्या तरुणाचा १२ हजार रुपये किमतीचा एका मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी चाकुचा धाक दाखवून हिसका मारुन चोरुन नेला. ही घटना भोसरी एमआयडीसी फुलेनगर येथील डी.वाय.पाटील रुग्णालयासमोरील गेटवर घडली.

याप्रकरणी वैभव रमेश महाजन (वय २६, रा. संतोषी माता मंदिराजवळ, नेहरुनगर) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोपेड दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१६) रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी वैभव हा भोसरी एमआयडीसी फुलेनगर येथून कामाला चालला होता. यावेळी एका मोपेड दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्याला चाकुचा धाक दाखवून त्याच्याजवळी १२ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल जबरदस्ती हिसका मारुन चोरुन नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.