Pimpri

भोसरी आणि हिंजवडीत दुचाकी चोरी

By PCB Author

July 19, 2019

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – शहरात मागील काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात महागड्या वाहन चोरणारी टोळी सक्रीय झाल्याने वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

गुरुवारी (दि.१८) भोसरी आणि हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीत दोन दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

भोसरी पोलिस ठाणे हद्दीतील कासारवाडी नाशिक फाटा उड्डान पुलाच्याखाली पार्क केलेली हिरो पॅशन २० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एमएच/१५/डीई/९३७४) ही शुक्रवार (दि.१२) अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी भोसरी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. तर बुधवारी (दि.१७) हिंजवडीतील डी हॉटेल समोर पार्क केलेली यामाह आरवन फाय (क्र.एमएच/३१/एफके/४८७०) ही ५० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.