भोसरीत २७ किलो गांजासह तरुणाला अटक

0
581

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – पोत्यामध्ये ४ लाख ६ हजार ६५० रुपये किमतीचा २७ किलो ११० ग्रॅम गांजा घेऊन आलेल्या तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.२१) दुपारी दोनच्या सुमारास भोसरीतील गावजत्रा मैदानाजवळील भाजी मंडईत करण्यात आली.

मतीन मेहबुब शेख (वय २६, रा. बालीक आश्राम रोड, लेंडकर मळा, अहमदनगर) असे गांजासह अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्यावर एनडीपीएस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भोसरी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, एक तरुण भोसरीतील गावजत्रा मैदानाजवळील भाजी मंडईत गांजा विक्रीसाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयीत मतीन याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये ४ लाख ६ हजार ६५० रुपये किमतीचा २७ किलो ११० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी ते जप्त करुन मतीन याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक काबुगडे अधिक तपास करत आहेत.