Bhosari

भोसरीत संत निरंकारी मिशनचा बाल संत समारोह उत्साहात

By PCB Author

July 02, 2018

भोसरी, दि. २ (पीसीबी) – संत निरंकारी मिशनच्या वतीने भोसरीतील संत निरंकारी सत्संग भवन येथे काल (रविवार) पुणे झोनचा बाल संत समागमचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सत्संग समारोहला २५०० हुन अधिक बालक तसेच पालक पिंपरी –चिंचवडसह पुण्यातील विविध भागातून उपस्थित होते.

या सत्संग सोहळ्यात मुंबई येथील अमित चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी मुलांना तसेच पालकांना समजावले की हा सत्संग मुलांना व्यासपीठ प्राप्त करून देण्यासाठी नाही तर या बाल समारोहाचा मूळ उद्देश हा आहे. आपल्या सर्वाना सदगुरूने दिलेल्या ब्रह्मज्ञानासोबत जोडून राहणे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ज्याप्रमाणे लोहाराच्या जवळ जाऊन त्याच्याजवळून वस्तू घ्या किंवा नका घेऊ त्याच्या भट्टीचा गरमपणा तुम्हाला मिळणार आहे, तशी दुर्जनांची संगत असते. तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करा किंवा नका करू त्यांची संगत तुम्हाला बिघडवण्याचे कार्य करीत असते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बाल समागम मध्ये मुलांनी अवतारवाणी गायन, हरदेववाणी गायन, कवी दरबार, नाटिका, गीत, प्रश्नमंजुषा, विचार याद्वारे सदगुरुचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवन्याचा प्रयत्न केला. मुलांनी तयार केलेली बाल प्रदर्शनी या समागमाचे विशेष आकर्षण ठरली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी मोहिते, गर्ग सचदेवा यांनी केले.