Bhosari

भोसरीत शाळकरी मुलीचा ड्रेस ओढून विनयभंग

By PCB Author

September 25, 2018

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – शाळेच्या गेटजवळ उभी असताना एका शाळकरी मुलीचा ड्रेस ओढून तसेच हात पकडून एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने विनयभंग केल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी (दि.२४) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भोसरीतील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेच्या गेटसमोर घडली.

याप्रकरणी पीडित मुलीची आत्या शांता शंकर जाधव (वय ४६, रा. शांतीनगर, वसाहत क्र.१, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी भोसरीतील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेत शिकते. सोमवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पीडित मुलगी शाळेच्या गेटजवळ तिच्या काही मैत्रीणींसोबत बोलत उभी होती. यावेळी १७ वर्षीय अल्पवयीन तरुण तिच्या जवळ आला. त्याने तिचा हात पकडून ड्रेस ओढला आणि अश्लिल भाषा वापरुन ‘किती जणांन सोबत होती माझ्या सोबतपण ये’ , असे बोलून विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आत्याने भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.