Notifications

भोसरीत विलास लांडे आणि भाजपमध्ये नवी राजकीय सेटिंग; लांडेंच्या होर्डींगवर सचिन पटवर्धनांचा फोटो

By PCB Author

January 12, 2019

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – भाजपमध्ये गेलो असतो, तर जानवे घालावे लागले असते. ते मला मान्य नव्हते, असे वक्तव्य करणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी लावलेल्या एका जाहिरात फलकावर भाजपचे राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांचा फोटो झळकला आहे. लांडे आणि पटवर्धन यांच्यातील या राजकीय सेटिंगमुळे भोसरीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लांडे हे पटवर्धनांच्या मार्फत भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना?, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे विलास लांडे यांच्यासोबत पटवर्धनांचा प्रथमच फोटो झळकल्याने भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे गट सावध झाला आहे.