Bhosari

भोसरीत मुली झाल्या म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा

By PCB Author

March 12, 2019

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – मुली झाल्याच्या कारणावरुन एका २४ वर्षीय विवाहितेचा सासरकडच्या मंडळींनी मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भोसरी परिसरात घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पती चंद्रकांत गायकवाड, सासरे व्यकंट गायकवाड, सासू शेषाबाई गायकवाड, दिर सुशांत गायकवाड या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित २४ वर्षीय महिलेचे चंद्रकांत गायकवाड यांच्यासोबत २०१३ मध्ये लग्न झाले आहे. त्यांना दोन मुली आहेत. सन २०१३ ते २०१९ दरम्यान पती चंद्रकांतसह सासरे व्यकंट गायकवाड, सासू शेषाबाई गायकवाड, दिर सुशांत गायकवाड या चौघांनी महिलेला दोन मुली झाल्या म्हणून मानसिक आणि शारिरीक छळ. तसेच माहेरून ५० हजार आणि ४ तोळे सोने घेऊन येण्यासाठी तगादा लावला होता. या छळाला कंटाळून पिडीतेने भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक काबुगडे तपास करत आहेत.