भोसरीत भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर कोत्याने वार

0
451

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – भांडण झाल्याचा राग मनात धरुन एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.१२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भोसरीतील लांडेवाडी येथे घडली.

अशोक रामभाऊ गव्हाणे (वय ३०, रा. विठ्ठलनगर लांडेवाडी) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे आहे. याप्रकरणी त्याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महादेव बाजीराव खाडे (वय ३०, रा. लांडेवाडी) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास अशोक आणि महादेव यांच्यामध्ये भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी महादेव याने लांडेवाडी येथून पायी चाललेल्या अशोकवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत अशोक गंभीर जखमी झाला आहे. भोसरी पोलिसांनी या प्रकरणी महादेव याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक हंडाळ अधिक तपास करत आहेत.