भोसरीत भर दिवसा 29 हजारांची घरफोडी

0
425

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – संत गाडगे महाराज कॉलनी, आळंदी रोड भोसरी येथे अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून 29 हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत घडली

महेंद्र कारभारी शेळके (वय 21, रा. शास्त्रीचौक, संत गाडगे महाराज कॉलनी आळंदी रोड, भोसरी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 29) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे संत गाडगे महाराज कॉलनीत विठ्ठल चौधरी यांच्या खोलीत राहतात. त्यांचे घर गुरुवारी दुपारी कुलूप लाऊन बंद होते. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण 29 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.