Bhosari

भोसरीत पीएमटी बसच्या धडकेत पिंपरी महापालिकेतील सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

By PCB Author

October 26, 2018

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – भोसरी येथील भोसरी-टेल्को रस्त्यावर सेचुरियंका कंपनीच्या समोरील कॉर्पोरेशन बँकेच्याजवळ एका पीएमटी बसने दिलेल्या धडकेत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (शुक्रवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

बी. एम ननवरे (वय ४०, पत्ता समजूशकलेला नाही) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याचा बॅच क्र (६८०९) आहे.

याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पीएमटी बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर मृत ननवरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.