भोसरीत परपुरुषासोबतचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहितेला पळवले

2861

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – परपुरूषासोबतचा फोटो व्हायरल करण्याची तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकी देवून एका विवाहित महिलेला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार (दि.८) भोसरी येथे घडली.

याप्रकरणी महिलेच्या ४२ वर्षीय पतीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बिभीषण गायकवाड (रा. नेहरूनगर, पिंपरी) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरून फिर्यादीच्या मुलीला फोन केला. तसेच मोबाईलवर फिर्यादीच्या पत्नीचा इतर पुरुषासोबतचा फोटो टाकला. तसेच फिर्यादीला तुझी पत्नी मला न भेटल्यास फोटो इतरत्र टाकून बदनामी करेन, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या मुलाच्या मोबाईलवर कॉल केला. यावेळी मुलाने फोटोबाबत विचारणा केली असता त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या पत्नीला गुरुवारी पळवून नेले. भोसरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे तपास करत आहेत.