भोसरीत दोन एटीएम मशीन फोडून ३५ लाखांची रोकड चोरट्यांनी केली लंपास

0
485

भोसरी, दि. १७ (पीसीबी)- गॅस कटरच्या सहाय्याने दोन एटीएम मशीन कापून त्यातील तब्बल ३५ लाख २६ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शुक्रवार (दि. १५) रात्री उशीरा पुणे-नाशिक रोड धावडे वस्ती भोसरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर घडली.

याप्रकरणी सचिन लांडगे (वय २१ रा. बापूजीनगर थेरगाव) भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरीतील धावडेवस्ती येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. येथे दोन एटीएम मशीन आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा अज्ञात चोरटे या एटीएम सेंटरमध्ये शिरले त्यांनी स्वत: गॅस कटरच्या सहाय्याने दोन्ही एटीएम मशीन कापल्या आणि त्यातील २० लाख १८ हजार ४०० रूपयांची रोख तर दुसऱ्या एटीएम मशीन मधील १५ लाख ७ हजार ७०० रूपयांची रोख असे एकूण ३५ लाख २६ हजार १०० रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. भोसरी गुन्हे शाखेचे पोलिस आरोपी चोरट्यांचा शोध घेत आहे.