Bhosari

भोसरीत तरुणीसोबत गंभीर गैरवर्तन करुन जीवे मारण्याची धमकी

By PCB Author

April 04, 2019

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – एका नर्सिंगच्या २७ वर्षीय विद्यार्थीनीसोबत एका तरुणाने गंभीर गैरवर्तन करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि.२) रात्री दहाच्या सुमारास भोसरीतील नंबर वन नर्सिंग ब्यरो मधील हॉस्टेलजवळ घडली.

याप्रकरणी २७ वर्षीय विद्यार्थीनीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश जाधव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २७ वर्षीय विद्यार्थीनी ही नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. ती सध्या भोसरीतील नंबर वन नर्सिंग ब्यरो मधील हॉस्टेलमध्ये राहते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास जेवण करुन विद्यार्थीनी रुममध्ये जात होती. यावेळी हॉस्टेलच्या जिन्याजवळ उभ्या असलेल्या आरोपी गणेशने तिचा हात पकडून आपण टेरेसजवळ बोलूनया असे बोलून मिठी मारण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीनी याचा विरोध केल्याने गणेश याने तिचा गळा दाबला आणि बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी गणेश विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.