भोसरीत टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
659

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने मागून दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना भोसरीतील राज मार्बल दुकानासमोर घडली.

हरिकांत ज्ञानदास मिश्रा (वय ३८, रा. रामदेव सुपर मार्केटजवळ, लांडगेनगर, भोसरी) असे मयत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, टेम्पो चालक प्रशांत वसंत रामगुडे (रा. हिंदराज कॉलनी, लांडगेनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१२) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर चालक प्रशांत रामगुडे याने त्याच्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर (क्र.एमएच/१२/एचए/०५५८) भरधाव वेघाने चालवून हरिकांत यांना मागून जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या हरिकांत यांचा मृत्यू झाला. आरोपी प्रशांत याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलिस तपास करत आहेत.