भोसरीत छत्रपती संभाजी राजे चरित्र कथा या कार्यक्रमाचे आयोजन

0
343

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – झी टॉकीज व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 10 मे 2022 दरम्यान झी टॉकीज प्रस्तुत “गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा “, या कार्यक्रमांतर्गत “छत्रपती संभाजीराजे चरित्रकथा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा . गणेश शिंदे व महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका संन्मीता धापटे शिंदे आहेत. हा कार्यक्रम रोज सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत भोसरीतील कै . अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज राजे यांच्या पराक्रमाची गाथा या कार्यक्रमातून उलगडणार आहे. संभाजी राजांना 32 वर्षे आयुष्य लाभले. या काळात त्यांनी गाजवलेला पराक्रम, शत्रूंशी केलेल्या लढाया, त्यांची प्रशासन व्यवस्था अशा अनेक विषयांची माहिती या चरित्रकथेतून समजणार आहे. सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा , असे आवाहन भोसरीचे माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष विलास लांडे, प्रा. गणेश शिंदे यांनी केले आहे.