भोसरीत खून झालेल्या ‘त्या’ तरुणाची ओळख पटली; दोघांना अटक

0
471

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – धारदार शस्त्राने वार करुन  एका २४ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी (दि.२३) पहाटे  भोसरीतील वाळके मळ्याशेजारी असलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनी येथून समोर आली होती. पोलिसांनी खून झालेल्या तरुणाची ओळख पटवली असून दोन तरुणांना अटक केली आहे.