भोसरीत अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या तरूणास अटक

0
1607

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीला पाहून फ्लाईंग किस देणाऱ्या एका तरूणाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना भोसरीतील गंधर्वनगरी येथे घडली.

याप्रकरणी १५ वर्षीय मुलीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहूल पोपट वाघमारे (वय २८, रा. गंधर्व नगरी, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहूल वाघमारे हा पिडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करायचा. आरोपीने फिर्यादी मुलीला पाहून फ्लाईंग किस देत तिचा विनयभंग केला. यामुळे राहुल विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावर पोलिसांनी तातडीने राहूल याला अटक केली. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.