Bhosari

भोसरीत अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडीओ यु ट्यूबवर अपलोड करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा

By PCB Author

March 27, 2019

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – एका तरुणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच ओळखीचा फायदा घेत मुलीचे अश्लील व्हिडीओ यु ट्यूबवर अपलोड करुन तिची बदनामी केली. ही धक्कादायक घटना जून २०१७ ते मार्च २०१९ दरम्यान भोसरी एमआयडीसी येथे घडली.  

याप्रकरणी पीडिते मुलीच्या भावाने मंगळवारी (दि.२६) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, देवा महादेव जमादार (वय २२, रा, भैरवनाथ मंदिराजवळ, भोसरी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवा हा वाहनचालक आहे. त्याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन बहिणीचा वारंवार पाठलाग करून ओळख केली. तसेच तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून आईलाही धमकावले होते. त्यानंतर मुलीचे एकांतातील फोटो यु ट्यूबवर अपलोड केले आणि मुलीलाही अश्लील व्हिडीओ पाठवले. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. याबाबत पिडितेच्या भावाला समजल्यानंतर त्याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतीश नांदुरकर तपास करत आहेत.