भोसरीत अल्पवयीन मुलीची छेड काढून घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी

0
638

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तरुणाने पाठलाग करुन हात धरला आणि “तु माझ्यासोबत पळुन चल नाहीतर तुझ्या घरच्यांना मारुन टाकीन”, अशी धमकी दिली. तसेच जाब विचारण्यास गेलेल्या मुलीच्या आईला देखील शिवीगाळ केली. ही घटना डिसेंबर २०१८ ते गुरुवार (दि.२१) २०१९ भोसरी एमआयडीसी येथील महात्मा फुलेनगरमध्ये घडली.

याप्रकरणी पिडित मुलीचे वडिल महादेव शिवलिंग हरवळकर (वय ४०, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी एमआयडीसी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश उच्चाप्पा खेडेकर (वय २१, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी एमआयडीसी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१८ ते गुरुवार (दि.२१) २०१९ या कालावधीत आरोपी ड्रायवर गणेश याने फिर्यादी हरवळकर यांच्या १३ वर्षीय मुलीचा पाठलाग केला. तसेच तिचा हात धरुन “तु माझ्यासोबत पळुन चल नाहीतर तुझ्या घरच्यांना मारुन टाकीन”, अशी धमकी दिली. घडलेली घटना मुलीने आईला सांगितली. यावर तिच्या आईने आरोपीला याचा जाब विचारला असता आरोपी खेडेकर याने त्यांना शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक आर.एन.पाटील तपास करत आहेत.