भोसरीतील सागरमाथा गिर्यारोहन संस्थेची माउंट मेन्टोक कांगरीवर यशस्वी चढाई

0
1024

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – भोसरी येथील सागरमाथा  गिर्यारोहन संस्थेने दशकपुर्तीच्या निमित्ताने लेह लढाख परिसरातील माउंट मेन्टोक कांगरी हे ६२५० मीटर उंचीचे शिखर नुकतेच यशस्वीपणे सर केले आहे.  

चार दिवसाच्या या मोहिमेला पुण्यातून १२ ऑगस्ट रोजी सुरूवात झाली होती. एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत पवार, संदिप तापकीर, सुमित दाभाडे, संग्राम बुर्डे, श्रीकांत जाधव, पांडुरंग शिंदे, श्रीधर घाडगे, निकेश रासकर, व संकेत घुले या दहा सदस्यांनी ही मोहिम यशस्वी केली, असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष प्रविण हरपळे यांनी दिली.

दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी मनाली लेह या मार्गातील अतिउंचवरील रोहतांग पास, बारलाचा पास, नकिला पास, लाचुंगला पास, व तांगलांगला पास या ठिकाणी राष्ट्रघ्वज फडकावून ७२ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मात्र, चोथ्या श्रीहरी तापकीर, श्रीकांत जाधव, पांडुरंग शिंदे आणि श्रीधर घाडगे यांना खराब वातावरणामुळे शिखरमाथा केवळ ८० मिटर बाकी असताना पाठीमागे परतावे लागले.

या मोहिमेसाठी फिनोलेक्स उद्योग समूहाच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या रितूजी छाब्रिया, मुकूल माधव फाउंडेशन, क्रांती शुगर सांगलीचे शरदभाऊ लाड आणि शिवनेरी फाऊंडेशनचे शेखर मोहिते पाटील यांचे आर्थिक सहकार्य लाभले.