Bhosari

भोसरीतील महिलेला लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने सव्वाबारा लाखांचा गंडा

By PCB Author

November 28, 2018

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – लोन मिळवून देतो असे सांगून एका फायनान्स कंपनीच्या एजन्टने एका ३० वर्षीय महिलेला तब्बल १२ लाख ६६ हजार २५० रुपयांना गंडा घातला आहे. ही घटना डिसेंबर २०१७ ते जुलै २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पंकज सिंह नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१७ मध्ये आरोपी पंकज सिंह याने फिर्यादी ३० वर्षीय महिलेच्या मोबाईवर फोन करुन तो बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून, तुम्हाला इंन्युरन्सवर लोन मिळेल असे सांगितले होते. त्याने महिलेला लोन संदर्भात माहिती देखील दिली. यावर महिलेने त्याला २८ लाखांचे लोन हवे असल्याचे सांगितले. आरोपीने तुमची फाईल लॉगिनसाठी पुढे पाठवतो असे सांगून फिर्यादी महिलेकडून वेळोवेळी एकूण १२ लाख ६६ हजार २५० रुपये उकळले. तसेच त्यांना लोन न मिळवून देताच पसार झाला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात आरोपी पंकज विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.