बालाजीनगर येथे नवरात्रोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून पिता-पुत्राला दगडाने मारहाण

0
1637

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – नवरात्रोत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून तिघा जणांनी मिळून पिता-पुत्राला दगडाने मारहाण केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.२५) रात्री दहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील बालाजीनगरमध्ये घडली.

मितेश रघुनाथ धनवे (वय २६) आणि त्याचे वडिल रघुनाथ धनवे असे मारहाण झालेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यानुसार प्रशांत सुनील कांबळे, संदीप आणि साहिल या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास मितेश आणि त्याचे वडिल रघुनाथ हे त्यांच्या बालाजीनगर येथील घरामध्ये जेवन करत होते. यावेळी आरोपी प्रशांत, संदीप आणि साहिल हे तिघेही तेथे आले आणि त्यांनी मितेश आणि त्याचे वडिल रघुनाथ यांच्याकडे नवरात्रोत्सवाच्या वर्गनीसाठी पैशांची मागणी केली. यावर मितेश याने येवड्यारात्री वर्गनी कशी देणार नंतर या देतो असे सांगितले. यामुळे आरोपी आणि मितेश यांच्यामध्ये वाद झाला आणि आरोपींनी मितेश याच्या डोक्या दगड मारुन त्याला गंभीर जखमी केले. तसेच त्याचे वडिल रघुनाथ यांना देखील दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन पसार झाले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.