Bhosari

भोसरीतील फुलेनगरमध्ये रिक्षाचालकाचा चाकूने वार करुन खून

By PCB Author

October 12, 2018

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसी परिसरातील फुलेनगरमध्ये राहणाऱ्या एका रिक्षाचालकाचा शेजारीच राहणाऱ्या तिघांनी धारदार चाकूने वार करुन खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.११) रात्री उशीरा साडेबाराच्या सुमारास घडली.

विनोद माताफेर गिरी असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दयाराम शितलाप्रसाद गिरी, बाबूराम शितलाप्रसाद गिरी आणि जयप्रकाश कृष्णा गिरी या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत विनोद गिरी हे फुलेनगरमध्ये शेजारी राहतात. त्यांच्या पूर्वीपासून किरकोळ कारणावरुन भांडणे देखील होत होती. गुरुवारी मात्री त्यांच्या पुन्हा खटके उडाले यावर रागाच्याभरात आरोपींपैकी एकाने विनोद यांच्या घराबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या ड्रमला लाथ मारली. यावर तिघे आरोपी दयाराम, बाबूराम आणि जयप्रकाश यांनी मिळून विनोद यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विनोदला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने तपास करत तिघा आरोपींना रात्री उशीरा अटक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.