Bhosari

भोसरीतील आदीनाथनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ; चार कारमधील टेप आणि रोख केली लंपास

By PCB Author

July 30, 2019

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – घराजवळ तसेच गॅरेजच्या बाहेर उभ्या असलेल्या एकूण चार कारच्या काचा फोडून त्यामधील टेप, रोख रक्कम आणि काही साहित्या असा एकूण २२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. एकाच रात्रीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना  रविवारी (दि.२८) रात्री आठ ते सोमवार (दि.२९) सकाळी आठच्या दरम्यान भोसरी आदीनाथनगरमधील गांधी इमारतीसमोर घडली.

याप्रकरणी बाळकृष्ण नारायण जाधव (वय ५६, रा. ६९०/३ ब, आदीनाथनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२८) रात्री आठ ते सोमवार (दि.२९) सकाळी आठच्या दरम्यान भोसरीतील आदीनाथनगरमधील गांधी इमारतीसमोर उभ्या असलेल्या चार कारच्या काचा फोडून त्यातील कारटेप, रोख रक्कम आणि महत्वाचे साहित्य असा एकूण २२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आणि नुकसान केले. रविवारी सकाळी हा प्रकार समोर आला. भोसरी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.