Bhosari

भोसरीच्या शितलबाग सोसायतीत साफसफाई, निर्जंतुक व औषध फवारणी

By PCB Author

June 15, 2020

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – शितलबाग सोसायटी मधील एकता प्रतिष्ठानच्या वतीने आज साफसफाई, निर्जंतुक व औषध फवारणी अभियाना पार पडले. सोसायटीतील बऱ्याच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सोशल डिस्टन्सचे पालन करून सहभाग घेतला.

माजी नगरसेवक भास्कर बोरुडे यांनी पाहण्याचा परिचय आणि स्वागत केले.कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकाबरोबर सोसायटीतील तरुण मुले व महिलांचा  सहभाग लक्षणीय होता.  त्याबद्दल सर्वांचे व महानगरपालिका अधिकारी रोकडे साहेब आणि मद्रासी साहेब यांचे सहकार्य आभार मानण्यात आले. ग्रुपच्या संकल्पने नुसार ग्रुपच्या माध्यमातून भविष्यात पण वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत. कोणाच्या मनात काही वेगळ्या संकल्पना असतील तर ग्रुप वर जरूर मांडाव्यात असे आवाहन त्यानी केले.