भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वी प्रज्ञा आघाडीवर; दिग्विजय सिंह पिछाडीवर

0
364

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आघाडीवर आहेत. भाजपाने इथून साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत आला. सर्वांचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याबरोबर साध्वी प्रज्ञा यांची लढत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून साध्वी प्रज्ञा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. सहाव्या टप्प्यात १२ मे रोजी भोपाळमध्ये मतदान झाले.

भोपाळ हा भाजपाचा गड असून साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे पंतप्रधान मोदींपासून वरिष्ठ नेत्यांनी समर्थन केले होते. साध्वी प्रज्ञा ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरें यांच्याबद्दल त्यांनी सुरुवातीलाच वादग्रस्त वक्तव्य केले होते. नंतर त्यांना माफी मागावी लागली होती.