“भूमिपूजनानंतर उद्धव ठाकरेही अयोध्येत जाणार, शिवसेना थाटामाटात कार्यक्रम करणार”

0
266

मुंबई,दि.५(पीसीबी) – भूमिपूजनानंतर उद्धव ठाकरेही अयोध्येत जाणार, शिवसेना थाटामाटात कार्यक्रम करणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, त्याचवेळी घुमट काढण्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा असल्याचं सांगताना कुणीही याचं श्रेय घेऊ नये असं म्हटलं.

“या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने तिथे कार्यक्रम करणार आहे. आजच्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी वयोमानामुळे उपस्थित राहू शकले नाहीत,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.