भूमकर चौकात अवजड वाहनांना बंदी; नागरिकांना सुचना मांडण्याचे आवाहन

0
730

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – भूमकर चौकातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित रहावी म्हणून तेथील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सकाळी सात ते दुपारी एकच्या दरम्यान आणि सायंकाळी चार ते रात्री नऊच्या दरम्यान येथे  अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणारी वाहने वगळण्यात आली आहेत. हा बदल मंगळवारी (दि. १८) पासून प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आला असून बुधवार (दि. २६) पर्यंत सुरु राहाणार आहे.

नागरिकांच्या सूचना आणि हरकती यांचा विचार करूनच अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती बुधवार (दि. २६) पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

भूमकर चौकातील वाहतुक व्यवस्थेत करण्यात आलेले बदल पुढील प्रमाणे:

*डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद

* मुंबई-बेंगलोर महामार्गावरून जिंजर हॉटेल येथून डावीकडे वळून भूमकर चौकाकडे जाणास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद

*मुंबई-बेंगलोर महामार्गावरून मायकार शोरूम येथून डावीकडे वळून भूमकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद

*वाकड ब्रिज येथून इंडियन ऑइल चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद