भूपेश बघेल छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री  

0
549

रायपूर, दि. १६ (पीसीबी) – छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असणारे भूपेश बघेल यांच्या नावावर अखेर मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिक्कामोर्तब केला. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी टी एस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरणदास अनंत  यांनी  दावेदार केली होते. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.  अखेर भूपेश बघेल यांनी बाजी मारली.   

भूपेश बघेल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले भूपेश बघेल यांची  आक्रमक नेते म्हणून ओळख आहे. ९० जागा असलेल्या छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसने ६८ जागांवर विजय मिळवला आहे. नव्या आमदारांचे नेतृत्व आता बघेल यांच्याकडे देण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकांपासून ते स्थानिक निवडणुकांसाठी त्यांनीच नियोजन केले आहे.

भूपेश बघेल पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी रमणसिंह सरकारसह काँग्रेसमधून फारकत घेतलेले अजित जोगी यांचाही सामना केला. कुर्मी क्षत्रिय परिवाराशी बघेल हे संबंधित आहेत. राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळवून देण्याची जबाबदारी दिली होती. ती मी पार पाडली, अशी प्रतिक्रिया त्यांनी निकालानंतर व्यक्त केली होती.