Desh

भूतानमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट ठार

By PCB Author

September 27, 2019

थिम्पू, दि. २७ (पीसीबी) – भूतानमध्ये भारतीय लष्कराचे चीता  हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन पायलट  ठार झाले आहेत. ही घटना आज (शुक्रवार) दुपारी १ वाजता भूतानच्या योंगफुला येथे घडली. लष्कराच्या ट्रेनिंग टीमचे हे हेलिकॉप्टर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेशाच्या खिरमू येथून योंगफुलाकडे जात असताना हे विमान कोसळले. त्यात दोन पायलट शहीद झाले.

दरम्यान, या वर्षभरात ९ लढाऊ विमाने आणि २ हेलिकॉप्टर कोसळून १२ जण ठार झाले आहेत.  यापूर्वी रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळच्या नांदगावात तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत होलिकॉप्टरमधील एक महिला जखमी झाली होती, तर तीनजण जखमी झाले होते.