Pune

भूकेपुढे धार्मिक रंगांना बेरंग ठरवणारा “रावण” मराठी शॉर्टफिल्म रिलीज

By PCB Author

October 18, 2018

पुणे, दि. १८ (पीसीबी) – आजच्या तत्कालीन समाजात तुम्हा आम्हा सारख्या लोकांना सहज दिसतात ते रंग,  रंग रंग न राहता धार्मिक, जातीवाद हे मुद्दे जीवंत होतात. त्या रंगात अडकलेला हा रावण जेंव्हा त्याच्या मूलभूत गरजांचा विचार करतो. तेव्हा हे धार्मिक रंग त्याच्या समोर फिके पडू लागतात. आणि मूलभूत गरजा ह्याच खरे रंग दाखवू लागतात.

हा संदेश देण्यासाठी Creatives Kida Production च्या वतीने “रावण” ही शॉर्टफिल्म बनविण्यात आली आहे.

या शॉर्टफिल्मचे लेखक व दिग्दर्शक प्रल्हाद जाधव, अभिनेता: गणेश मुंढे, छायाचित्रण पीटर इंगळे, संकलक विशाल शिवनखेडकर, कला दिग्दर्शक तुषार वाशीलकर, प्रोडक्शन मॅनेजर मनु निळे तर तांत्रिक साहाय्य मयूर गव्हाणे, प्रकाश सदाफुलें, योगेश ढाकणे आणि अनिल चौधरी यांनी केले आहे. दरम्यान, भूकेपुढे धार्मिक रंगांना बेरंग ठरवणारा “रावण” मराठी शॉर्टफिल्म पाहण्यासाठी आपण https://bit.ly/2ED6YJ4 या लिंकवर पाहू शकतात.