Desh

भीम आर्मी, बहुजन युथ संघटनेचा बसपाशी संबंध नाही, दलितांच्या भावनांशी ते खेळत आहेत- मायावती

By PCB Author

November 24, 2018

नवी दिल्ली, दि, २४ (पीसीबी) – भीम आर्मी, बहुजन य़ूथ फॉर मिशन २०१९ यांसारख्या संघटना विरोधकांकडून पडद्यामागून चालवल्या जात आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते दलित वस्त्यांमध्ये जाऊन आमच्या भोळ्या-भाबड्या लोकांची दिशाभूल करीत आहेत, त्यांच्या भावनांशी खेळत आहेत, असा खळबळजनक आरोप बहुजन समाज पक्ष्याच्या सर्वोसर्वा मायावती यांनी केला आहे.

मायावती म्हणाल्या, या संघटना दलित वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही मायावती यांना पंतप्रधान बनवणार असल्याचे सांगत आहेत. माझे नाव सांगून ते लोकांकडून निधीही उकळत आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते आमच्या लोकांना लोकांना उच्च जातीतील लोकांविरोधात भडकावत आहेत. त्यांच्या मनात द्वेष पसरवत आहेत. पक्षाच्या वाढीमध्ये या संघटना अडथळा ठरत आहेत. बसपा सर्व जातीधर्मांचा पक्ष आहे. या संघटना वैयक्तिक स्वार्थासाठी निर्माण झाल्या आहेत.

भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना मायावती म्हणाल्या, मोदी सरकारची पाच वर्षे आता पूर्ण होत आली आहेत. त्यांनी लोकांना दिलेल्या आश्वासनांपैकी ५० टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही असं ठामपणए वाटतयं की आता ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत.