Pune

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: पाचही संशयितांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

By PCB Author

November 15, 2018

पुणे, दि. १५ (पीसीबी) – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात आज (गुरुवार) पुणे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये संशयित आरोपी सुधिर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन या पाच जणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.डी.वदने यांच्या न्यायालयात या प्रकरणाचे तपास अधिकारी एसीपी शिवाजी पवार यांनी ५ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. पुण्यातील रहिवाशी तुषार दामगुडे यांनी ८ जानेवारी रोजी याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. पुणे पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपत्र सादर करण्यास मुदत वाढ करुन घेतली होती. ही मुदत संपण्याअधिच या प्रकरणातील तापसी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात गती येईल असे दिसते.