भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: गौत्तम नवलाखा यांची नजरकैदेतून मुक्तता

0
417

दिल्ली, दि. १ (पीसीबी) – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नक्षली संबंधाच्या आरोपावरुन नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौत्तम नवलाखा यांची नजरकैदेतून मुक्तता करण्याचे आदेश आज (सोमवार) दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेच्या संदर्भात या वर्षी २८ ऑगस्टला पाच जणांना अटक केली होती. त्यात तेलगू कवी राव, कार्यकर्ते व्हेरनॉन गोन्सालविस, अरुण फरेरा, कामगार संघटनेच्या नेत्या सुधा भारद्वाज, नागरी हक्क कार्यकर्ते नवलाखा यांचा समावेश होता.

मात्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवलाखा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने नवलाखांचे ट्रांजिस्ट रिमांड आदेश रद्द केले आहेत. नवलाखा यांना २४ तासापेक्षा अधिक वेळ ताब्यात घेणे योग्य नसल्याचेही हायकोर्टाने म्हटले आहे.