भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले अरुण फरेरा यांना चौकशी दरम्यान मारहाण झाल्याचा आरोप

0
874

पुणे, दि. ६ (पीसीबी) – भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले आरोपी अरुण फरेरा यांनी आपल्याला पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान मारहाण झाल्याचा आरोप कोर्टासमोर जबाब देताना आज (मंगळवार) केला. या मारहाणीनंतर आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी कोर्टाला सांगितले आहे. दरम्यान, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि वर्नन गोन्साल्विस या तिघांना मंगळवारी पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.

यावेळी कोर्टासमोर साक्ष देताना फरेरा म्हणाले, ४ नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांच्या कोठडीत चौकशी दरम्यान पोलिसांनी आपल्या ८-१० वेळा कानशिलात लगावल्या. अशा प्रकारे गंभीर मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ नोव्हेंबर रोजी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  दरम्यान, पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जबाब परेरा यांनी इनकॅमेरा न्यायाधीशांसमोर नोंदवला.