Maharashtra

भीमा कोरेगाव प्रकरणातील ३४८, मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे मागे

By PCB Author

February 27, 2020

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील ३४८ गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे राज्य शासनाकडून मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली.

देशमुख म्हणाले, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एकूण ६४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी सध्या ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे देखील मागे घेण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर, मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणातील ५४८ पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांसारख्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आली आहेत. तर मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. मात्र, सार्वजनिक मालमत्तेवर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमधील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत,

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 27, 2020

याशिवाय नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे घेतले असून शेतकरी आंदोलनातील गुन्हेदेखील लवकरच मागे घेण्यात येईल..@OfficeofUT @AjitPawarSpeaks @NCPspeaks @INCIndia @ShivSena @PawarSpeaks @DGPMaharashtra

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 27, 2020