Maharashtra

भिता कोणाला, मी तर सर्वांत मोठी गुंड – पंकजा मुंडे

By PCB Author

December 03, 2018

अहमदनगर, दि. ३ (पीसीबी) – अहमदनगर महापालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सभा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. एका सभेदरम्यान, एका कार्यकर्त्याने या परिसरात गुंडांचा मोठा उपद्रव होत असल्याची तक्रार पंकजा यांच्याकडे केली. गुंडापासून संरक्षण मिळण्यासाठी काहीतरी करा, असे सांगितले. यावर भिता कोणाला, मी तर सर्वांत मोठी गुंड आहे.  हा परिसर भयमुक्त करू, असे आश्वासन पंकजा यांनी दिले. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून पंकजांच्या धाडसी आश्वासनाचे स्वागत केले.

पंकजा यांनी नगरमधील सभांमध्ये विविध प्रश्नांवर  कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजपने राबविलेल्या सर्व योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचविण्याची आवाहन केले. आगामी काळात भाजप हाच पक्ष शिल्लक राहिल, असेही त्या यावेळी म्हणाल्या. घड्याळ बंद पडले आहे. बाणाशी आमची राज्यात युती आहे, मात्र, त्याच्याकडे तुम्ही पाहू नका, नाहीतर तो बाण तुम्हाला लागेल. हात दाखवून अवलक्षण करू नका. कमळाला साथ द्या. तुमचे भवितव्य उज्ज्वल असेल, असा विश्वास त्यांनी  सभांमधून कार्यकर्त्यांना दिला.