Pune

भिडे आणि एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी

By PCB Author

December 23, 2019

पुणे, दि.२३ (पीसीबी) –  कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन समारंभ होणार आहे. या दिवशी शिव प्रतिष्ठानचे संभाजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भिडे आणि एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिली आहे. कार्यक्रम सुरळीतपणे होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करत आहोत, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले.