Maharashtra

भिंतीवर डोक आपटून मुलाने केला वयोवृध्द आईचा खून

By PCB Author

January 22, 2019

वाई, दि. २२ (पीसीबी) – वयोवृध्द आईचा पोटच्या मुलानेच भिंतीवर डोके आपटून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास आकोशी तालुका वाई येथे घडली.

सोनाबाई धोंडीबा भणगे (वय १०५, रा. आकोशी, वाई) असे मृत वृद्ध आईचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा विठ्ठल धोंडीबा भणगे (वय ५०, रा. गणेशवाडी) याला पोलिसांनी अटक केली असून, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ सुमारास आरोपी मुलगा विठ्ठल भणगे याने  रामचंद्र धोंडीबा भणगे यांच्या मालकीच्या दत्त मंदिरातील मूर्तींची मोडतोड करून विंटबना केली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ त्याच्या घरी गेले. त्या वेळी सोनाबाई भणगे यांच्या डोक्‍यातून व कानातून रक्त वाहत होते आणि त्या निपचित पडल्या होत्या. ‘आई माझ्याशी लई भांडत होती म्हणून तिचे डोके भिंतीवर आपटून तिला कायमची संपविली,’ असे विठ्ठलने सांगितले. त्यानंतर पोलिस पाटील कृष्णदेव रामचंद्र भणगे यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठलला अटक करून न्यायालयात हजर केले. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बबन येडगे करीत आहेत.