भिंतीमध्ये दडवलेली १० कोटी रुपयांची रोकड आणि तब्बल १९ किलो चांदीच्या विटा

0
411

मुंबई , दि.२३ (पीसीबी) : झवेरी बाजारात भिंतीमध्ये दडवलेली १० कोटी रुपयांची रोकड आणि तब्बल १९ किलो चांदीच्या विटा सापडल्या आहेत. राज्यकर (जीएसटी) विभागाने केलेल्या कारवाईत ही बाब समोर आली.

मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल २०१९-२० मध्ये २२.८३ कोटी रुपयांवरून २०२०-२१ मध्ये ६५२ कोटी आणि २०२१-२२ मध्ये १७६४ कोटी रुपयांवर गेली. राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आल्यानंतर विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही.

कंपनीच्या ३५ चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली ९ कोटी ७८ लाखांची रोकड आणि १३ लाख रुपये किंमतीच्या १९ किलो चांदीच्या विटा आढळून आल्या. राज्य जीएसटी विभागाने ही जागा सीलबंद केली असून प्राप्तिकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे.