भारत-पाकिस्तान दोघांनी चर्चा करुन काश्मीरचा मुद्दा सोडवावा – इम्रान खान  

0
893

इस्लामाबाद, दि. २६ (पीसीबी) – भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये काश्मीर हा महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी मानवधिकाराचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान दोघांनी चर्चा करुन काश्मीरचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (गुरूवार) व्यक्त केले आहे.

‘तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पाऊल पुढे टाकू’ असे म्हणत भारताबरोबर संबंध सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या आधी भारतीय प्रसारमाध्यमांनी मी बॉलिवूडचा विलन असल्यासारखी माझ्यावर चिखलफेक केली होती, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

भारताबरोबर व्यापारी संबंध विकसित करणार आहे. भारत-पाकिस्तानमध्ये जितका व्यापार वाढेल, तितके संबंध सुधारण्यास वाव असेल. दोन्ही देशांना या व्यापारी संबंधांचा फायदा होईल, असा विश्वास इम्रान खान यांनी  व्यक्त केला.