भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

0
591

नवी दिल्ली,  दि. १४ (पीसीबी) – भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्थर डफलो यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह मायकल क्रेमर यांनाही संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या तीन अर्थशास्त्रज्ञांना वैश्विक गरिबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी हा पुरस्कार देऊ सन्मानित  करण्यात येणार आहे.

अभिजीत बॅनर्जी सध्या मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तसेच त्यांची पत्नी डफलो ‘अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी अॅक्शन लॅब’ चे को-फाउंडर आहेत. बॅनर्जी यांनी १९८१ मध्ये कोलकाता युनिव्हर्सिटीमधून विज्ञान शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर १९८३ मध्ये जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीतून एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. १९८८ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी मिळवली.