भारतीय योग संस्थान, विश्र सिंधी सेवा संगम आणि सुपर हंड्रेड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन

0
289

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) : आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने पिंपरी येथील बी टी अडवानी धर्मशाळा येथे भारतीय योग संस्थान, विश्र सिंधी सेवा संगम आणि सुपर हंड्रेड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात सरकारने दिलेल्या नियमानुसार सोशल डिसटंगसींग चे पालन करुन सुमारे साठ ते सत्तर योग साधकांनी सहभाग घेतला. या वेळी बोलताना किरण रामनानी यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आणि आताच्या कोरोना महामारी मध्ये योगाचे महत्त्व किती आहे याचे मार्गदर्शन केले भारतीय योग संस्थान हि संस्था गेली २२ वर्षे विनामूल्य योग साधनेचे काम करीत आहे अशी माहिती दिली आजच्या योग शिबिरात राजेश वालेचा यांनी योगाचे प्रकार कसे करावे आणि त्याचा उपयोग आपल्या शरीराला किती आवश्यक आहे. याचे महत्व सांगितले

या वेळी वरील संस्थाचे रचना मेघराजानी, पुजा मुलचंदानी, मनोहर जेठवानी, अजित कंजवानी, मनोहर चुगनानी, अशोक वासवानी, चंदू रामनानी, सुरेंद्र मंगनानी चेतन उचानी, प्रदिप नचनानी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन ज्योती मुलचंदानी, भावना परयानी, रबिना मिरानी अरुण लोखंडे, गटटु महादेव आदिनीं यशस्वीपणे केले.