भारतीय खेळाडूंच्या दुसऱ्या कसोटीतील कामगिरीत सुधारणा

0
251

मेलबर्न, दि.२७ (पीसीबी) : विराट कोहली सध्या मायदेशी परतला आहे, रोहित शर्मा अजूनही संघात नाही, महम्मद शमी जायबंदी, के. एल. राहुलला अंतिम अकरात स्थान मिळू शकले नाही, अशा परिस्थितीत शांत स्वभावाच्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला कसा सामोरा जातो, ही प्रत्येकाला उत्सुकताच होती. मात्र, भारतीय खेळाडूंनी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातील निराशजनक कामगिरीत सुधारणा केली आणि ऑस्ट्रेलियाला दोनशे धावांच्या आत रोखण्यात यश मिळविले. गोलंदाजांनी आपले काम चोख बजावल्यावर दिवसाअखेर भारताने मयांक अगरवालची विकेट गमावून ३६ धावा केल्या. आघाडी घेण्यासाठी भारताला आणखी १५९ धावांची गरज आहे.

सकाळी नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजुने लागल्यावर खेळपट्टी थोडी ओलसर असल्याने भारतीय सलामी जोडी मैदानात येईल अशी अपेक्षा होती. मात्र, बर्न आणि वेड ही यजमानांची सलामी जोडी मैदानात होती. त्यामुळे थोडे आश्चर्य वाटले. आलेल्या संधीचा पुरेपुर फायदा भारतीय गोलंदाजांनी घेतला. बुमराह आणि उमेश यादवने सुरुवातीला अचूक मारा केला. त्यात बुमराह जो बर्नची विकेट मिळविण्यात यशस्वी झाला. यादवला विकेटही मिळाली नाही आणि नंतर त्याचा मारा फारसा प्रभावी नव्हता. अकराव्या षटकातच रहाणेने हुक्कमी एक्का अश्विनच्या हाती चेंडू दिला आणि त्याने मॅथ्यू वेड व स्टिव्ह स्मिथची विकेट मिळवून ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर ढकलले. रहाणेने गोलंदाजीत बदल करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीन विकेट गेल्यानंतरही मार्नस लॅबुशेंग व ट्रॅव्हीस हेडने चिवट प्रतीकार केला. दोघांनी ८६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव लांबला.
दोन वर्षापूर्वी याच मैदानावर भारताने विजय मिळवून ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची मुहर्तमेढ रोवली होती. त्यामुळे आजचा खेळ पाहता ती कामगिरीही या युवा भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली असावी. आता आणखी चार दिवसांचा खेळ शिल्लक असून नववर्षाचे स्वागत हसऱ्या चेहऱ्याने करायचे असेल तर भारतीय फलंदाजांना प्रथम भक्कम धावसंख्या उभारावी लागेल आणि त्यानंतर गोलंदाजांना पुन्हा कमाल करावी लागेल.

दोन वर्षापूर्वी याच मैदानावर भारताने विजय मिळवून ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची मुहर्तमेढ रोवली होती. त्यामुळे आजचा खेळ पाहता ती कामगिरीही या युवा भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली असावी. आता आणखी चार दिवसांचा खेळ शिल्लक असून नववर्षाचे स्वागत हसऱ्या चेहऱ्याने करायचे असेल तर भारतीय फलंदाजांना प्रथम भक्कम धावसंख्या उभारावी लागेल आणि त्यानंतर गोलंदाजांना पुन्हा कमाल करावी लागेल.

सिराज उपाहारानंतर गोलंदाजीस आला. मात्र, सुरुवातीचे चार षटके त्याला लय व टप्पा मिळविण्यातच गेले. त्यानंतर त्याने अचूक मारा केला आणि प्रथम धोकादायक लॅबुशेंगला व त्यानंतर ग्रीनला टिपले. त्याने दोन झेलही घेतले. लॅबुशेंग आणि हेड बाद झाल्यावर शेपटी वळवळणार नाही, याची काळजी रहाणेने घेतली आणि बुमराह, अश्विन, जडेजा, सिराज यांनी आपली जबाबदारी अचूक निभावली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा डाव १९५ धावांवर आटोपला.

दोन वर्षापूर्वी याच मैदानावर पदार्पण करताना अर्धशतक करणारा मयांक अगरवाल यावेळी अपयशी ठरला. स्टार्कच्या गोलंदाजीवर तो शुन्यावर पायचीत झाला. त्यामुळे पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावातील खेळाची पुनरावृत्ती होती की काय असे वाटू लागले होते. मात्र, शुभमन गिल आणि पुजाराने उर्वरीत षटके आरामात खेळून काढली आणि ३६ धावाही फलकावर लावल्या. त्यात गिलचा २८ तर पुजाराचा सात धावांचा वाटा आहे.

त्यापूर्वी उपाहाराच्या ठोक्याला अश्विनचा सरळ येणाऱ्या चेंडूला स्विपचा फटका मारण्याचा लॅबुशेंगचा प्रयत्न फसला आणि चेंडू त्याच्या मांडीला लागला. त्यामुळे प्रथमदर्शनी तो पायचीत असल्याचे सर्वांनाच वाटले. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केल्यावर पंचांनी बोट वर केले. त्यावर लॅबुशेंगने डीआरएसची मागणी केली. त्यात चेंडू यष्टीच्या वरून जाताना दिसला. त्यामुळे पुन्हा तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चर्चा सुरू झाली. त्यामुळे साहजीकच लॅबुशेंगला जीवदान मिळाले असले तरी भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया प्रश्नार्थक होती.

स्टीव्ह स्मिथने भारताला नेहमीच सतावले आहे. त्यामुळे त्याचे बाद होणे भारतीय खेळाडूंसाठी आनंददायी घटना होती. पहिल्या कसोटीत ज्याप्रमाणे अश्विनने त्याला टिपले. त्याचप्रमाणे यावेळीही अलगद जाळ्यात ओढले. दोन्ही वेळेस चेंडूचा टप्पा सारखा होता. मात्र, पहिल्या कसोटीत स्मिथ स्लीपमध्ये बाद झाला होता तर यावेळी लेगस्लिपमध्ये झेल देऊन तंबुत परतला. यामुळे तो तब्बल चार वर्षे आणि ५२ डावानंतर शुन्यावर बाद झाला. यापूर्वी तो २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुन्यावर बाद झाला होता. स्मिथला बाद करण्याची ही अश्विनची कसोटीतील पाचवी वेळ होय.

ऑस्ट्रेलिया पहिला डाव – जो बर्न झे. पंत गो. बुमराह ०, मॅथ्यू वेड झे. जडेजा गो. अश्विन ३०, मार्नस लॅबुशेंग झे. गिल गो. सिराज ४८ (१३२ चेंडू, ४ चौकार), स्टिव्हन स्मिथ झे. पुजारा गो. अश्विन ०, ट्रॅव्हिस हेड झे. रहाणे गो. बुमराह ३८, कॅमरॉन ग्रीन पायचीत गो. सिराज १२, टिम पेन झे. विहारी गो. अश्विन १३, पॅट कमिन्स झे. सिराज गो. जडेजा ९, मिचेल स्टार्क झे. सिराज गो. बुमराह ७, नाथन लायन पायचीत गो. बुमराह २०, जोश हॅझलवुड नाबाद ४, अवांतर १४, एकूण ७२.३ षटकांत सर्वबाद १९५.बाद क्रम ः १-१०, २-३५, ३-३८, ४-१२४, ५-१३४, ६-१५५, ७-१५५, ८-१६४, ९-१९१, १०-१९५गोलंदाजी ः बुमराह १६-४-५६-४, यादव १२-२-३९-०, अश्विन २४-७-३५-३,, जडेजा ५.३-१-१५-१, सिराज १५-४-४०-२.