भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळं कोरोनाला रोखण्यात यश – मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दिले जनतेला धन्यवाद

0
390

मुंबई, दि. 31 (पीसीबी) : इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक आहे. तरीही कोरोना संसर्ग आटोक्यात, मृत्यूदरही कमी, जे नुकसान झालं त्याचं दु:ख आहेच, मात्र जे वाचवू शकलो, त्याबद्दल जनतेचे आभार, कारण हा लढा जननेतृत्वात सुरु आहे. हा लढा प्रदीर्घ काळ चालणारा आहे. भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळं कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे. देशवासीयांची सेवाशक्ती ही आपली खरी ताकद असल्याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींची ही 65 वी’मन की बात’ आहे. पंतप्रधान मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रम करतात. या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या विषयांवर लोकांना संबोधित करतात.

कोरोनाच्या लसीवर देशात जे काम सुरु आहे, त्याकडे जगाच्या नजरा आणि आपल्या आशा, या संकटाचा अनुभवही नाही आणि इलाजही, त्यामुळे हा लढा दीर्घकालीन असेल, प्रत्येक वर्गाला कोरोनाचा फटका बसला, मात्र गरीब सर्वाधिक पिचले गेले. श्रमिक आणि इतर ट्रेन सुरु, सावधानता बाळगून हवाई सेवा सुरु, उद्योगही सुरु, म्हणजेच अर्थव्यवस्थेचा मोठा भाग खुला झाला, अशात आपल्याला अधिक काळजी घ्यायला हवी, असे मोदी म्हणाले.
कोरोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.
पंतप्रधान म्हणाले, “देशात सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून कोरनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील कोरोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगानं फैलाव हाऊ शकला नाही. कोरोनामुळं होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूपच कमी आहे. मात्र, आपलं जे नुकसान झालं आहे त्याचं आपल्या सर्वांनाच दुःख आहे. मात्र, जे काही आपण वाचवू शकलो. ते निश्चितपणे देशाच्या सामुहिक संकल्पशक्तीचाच परिणाम आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातमधील महत्त्वाचे मुद्दे
– माझ्या मनाला स्पर्श करणारी आणखी एक गोष्ट ही की, संकटाच्या या काळात सर्व देशवासीय, खेड्यांपासून शहरं, आमच्या छोट्या व्यापाऱ्यांपासून ते स्टार्टअपपर्यंत, आपल्या लॅबमध्ये कोरोनाविरूद्धच्या लढाईत नवीन मार्ग शोधून काढले जात आहेत.
– नाशिकचे राजेंद्र यादव यांचं उदाहरण खूप रंजक आहे. राजेंद्र हे नाशिकमधील सतना गावचे शेतकरी आहेत. आपल्या गावाला कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी, त्यांनी ट्रॅक्टरला जोडून स्वच्छता यंत्र बनवलं आहे आणि ही मशीन अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे.
-इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाला रोखण्यात पुढे आहे
-देशात एकजुटीने कोरोना विरोधात लढा सुरू आहे
-संकटाच्या काळात झालेल्या संशोधनाचं मोदींकडून कौतुक
-देशाच्या सामूहित शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश
– याशिवाय स्वदेशी वस्तुंना उद्योगांना चालना मिळत आहे