Notifications

भारताला कसोटी मालिकेपूर्वीच धक्का; दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ संघाबाहेर

By PCB Author

November 30, 2018

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वीच धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला दुखापत झाली असून त्याला पहिल्या कसोटीमधून वगळण्यात आले आहे. पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत खेळणार की नाही असे बीसीसीआयने ट्विट करून सांगितले आहे.