भारताला उत्तर देण्याचा आम्हाला हक्क; पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्याची दर्पोक्ती

0
661

इस्लामाबाद, दि. २६ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेली कारवाई अत्यंत गंभीर आहे. भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानला आत्मसंरक्षणासाठी भारताला चोख उत्तर देण्याचा हक्क आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.

बालाकोटमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर   कुरेशी यांनी परराष्ट्र मंत्रालयात तातडीची उच्च स्तरीय बैठक बोलावली. या  बैठकीनंतर बोलताना कुरेशी म्हणाले की,  भारत अस्थिरतेकडे वाटचाल करत आहे. हे सगळे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केले जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

पाकिस्तानचे लष्कर भारताचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच आम्ही पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत विशेष बैठक घेणार आहे,  असे त्यांनी सांगितले.  भारताने नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. याबाबत आपण स्वत: विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना  परिस्थितीची माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले.