भारताने पाडलेल्या पाकिस्तानच्या विमानाचे अवशेष सापडले

0
589

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – भारतीय हद्दीत घुसलेले  पाकिस्तानी  एफ -१६ विमान भारताने पाडले होते, त्याचे अवशेष पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले आहेत. भारतीय वायूदलातील मिग २१  विमानाने हे विमान पाडले होते.  त्यामुळे आमचे विमान पाडले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे.

भारत सरकारनेही पाकिस्तानी विमान पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र, पाकिस्तानने अद्याप ही बाब स्वीकारली नव्हती. तर एफ १६ विमानाचा वापरच झाला नव्हता, असा दावाही पाकिस्तान सैन्याच्या प्रवक्त्यांनी केला होता. पण पाकिस्तान ज्या अवशेषांना भारताचे विमान असल्याचा दावा करत आहे, ते  जीई एफ ११० इंजिन असलेले एफ १६  विमान असल्याचे सिध्द झाले आहे.

एनएनआय या वृत्तसंस्थेने एफ१६ विमानाच्या इंजिनाचा एका फाईल फोटोही शेअर केला आहे, जे ढिगाऱ्यात दिसत असलेल्या फोटोशी मिळतंजुळतं आहे. फोटोमध्ये दिसणारे अवशेष एफ १६ विमानाच्या इंजिनाचा भाग आहे. ढिगाऱ्याजवळ पाकिस्तानी अधिकारीही उभे असल्याचे दिसत असून ७ नॉर्दन लाईट इन्फ्रंट्रीचे आहेत.