“भारताने आज रामराज्यात प्रवेश केला आहे”

0
299

अयोध्या,दि.५(पीसीबी) – ५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस असून आपल्या कित्येक पिढ्या आजचा दिवस लक्षात ठेवतील. आज आपण रामराज्यात प्रवेश करत आहोत, असं प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी अयोध्येत राम मंदिराचा पायाभरणी समारंभ पार पडत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आज अखेर उजाडला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव अयोध्येत दाखल झाले आहेत.

बाबा रामदेव अयोध्येत दाखल होताच त्यांनी हनुमानगढी येथे पूजा केली आहे. दरम्यान आजच्या भूमिपूजनाच्या समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून विशेष विमानाने अयोध्येला रवाना झाले आहेत. 11.30 च्या सुमारास अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर त्यांचं आगमन होणार आहे. त्यानंतर पावणे बाराच्या सुमारास हनुमानगढी येथे जाऊन ते दर्शन आणि पूजा करणार आहेत.